October 11, 2008

माणूस नावाचे कोडं,,,,

एकदा घामाने तरबतर झालेली, पाठीवर मोठी bag (दिवसभराचे दोन डबे, physics आणि chemistry चं journal, 6/7 वह्या,आणि नेमके त्या दिवशी विकत घेतलेले "halliday and resnick"चं पूस्तक) , आणि हातात दोन फ़ाईलवजा electronics journals सावरत एक मूलगी दादरला चर्चगेटवरून येणा-या विरार लोकलमध्ये धडपडत पहील्या वर्गाच्या महीला डब्यात संध्याकाळी सहा-साडेसहाच्या दरम्यान चढते.

ती स्वतःचा तोल सावरत सावरत आत येईस्तोवर तिची नजर इकडेतिकडे चटकन भिरभिरते.. एखादी चौथी seat तरी मिळते का म्हणून (फ़ोल आशा , जिथे चौथ्याseat जवळ पण उभे राहायला जागा नाही तिथे बसायला??)! ती आता व्यवस्थित त्या डब्यात तोल सावरून उभी राहते, परत इकडे-तिकडे नजर फ़िरवते bandraला तरी कूणी ऊठेल या आशेने!
मग आत येउन दोन समोरासमोरच्या seatsमधल्या जागेत खिडकीपासून तिसरी उभी राहते आणि "Can i keep my bag on that rack?" अशी शेजारच्या बाईला विनंती करते. ( तिला बहूतेक, "मला bag ठेवायची आहे तेव्हा आपापली धूडं घेऊन क्रूपया बाजूला व्हा, असे सूचवायचे असणार")
तिच्या या धडपडीत चूकून एका ऐसपैस बसलेल्या बाईला पाय लागतो, ती "ऐसपैस बसलेली हीच्याकडे बघू लागते" आणि आजूबाजूच्या गर्दीतून, आपल्याला किती त्रास होतोय अशा अर्थाचे "चं, चं,these college students don't have manners" उद्गार बाहेर पडतात, ती अजूनच ओशाळ्ते, पाठीवरचं ओझं नकोसं होते तीला!!

एवढ्यात तिच्या लक्षात येते, कि जिला आपला पाय लागला होता, ती मात्र आपल्याकडे टक लावून बघतेय, पापणीही न हलवता ! आता हीला अजूनच राग आला, मनातल्या मनात म्हणू लागली "काय बाई आहे, एकतर हीच्यामूळे ही bag अशीच पाठीवर रूळतेय अजून, आणि आता माझंच काही चूकल्यासारखे वटारून पाहतेय, जरा हसं आहे की नाही हीच्या तोंडावर?, हीला नसतील मूलं? कशी बघतेय हि... "

तेवढ्यात, एक कूणितरी आकाराने प्रचंड असलेली बाई आत येऊन seats विषयी चौकशी करायला लागली. "जीला पाय लागला होता" तिला विचारलं असता मान हिच्याकडून न वळवता हातानेच दोन बोटं हलवून नाही सांगितले, बोलायची पण इच्छा नाही !!

आता तर हिला अजूनच राग आला,मनात परत सूरू,( काहीतरी सांताक्रूझ आले होते तेव्हा, खिडकीतून दिसले)
" काय रे बाबा, म्हणावं या बाईला, अशी का पाहतेय?, हिला काय एवढे गमतीशीर दिसंलं माझ्यात? अगं बाई, काकू, मावशी, मामी, जी कूणी असशील जरा दूसरीकडे बघना! इथे काय?, त्यात चेह-यावर हसू नाहीये तूझ्या! मला हे आवडत नाहीये हे पण लक्षात येऊ नये का गं"..
आता तर हिच्या मनात भलत्याच शंका यायला लागल्या, लागोलाग तिने शर्टाची बटणं तपासली, मग pantची झिप, केस, चेहरा.. काहीच "problem" नाही, मग का बघतेय ही इथे?

हा खेळ असाच चालू राहीला, तिचे बघणे आणि हीचे धूसफ़ूसणे!

अंधेरी आले, ती उठली आणि हीलाच हाताच्या इशा-याने इथे बस म्हणून सांगितले, ती बसली, बरं वाटलं, "thanks" वगैरे काही पण म्हणाली नाही.
ती बाहेर जाऊन उभी राहीली, आणि मग गर्दीत हरवली, हिलाही आता तिची चिंता कशाला?, स्वतःला आयतं बसायला मिळालं!

उतरायची वेळ आली, तेव्हा हि आपले सारे सामान (तेच सगळें) उचलून बाहेर आली तर अवाक, ती बाई तिथेच उभी होती..
अरे !! हि अवाक!!

तिला उतरायचे नव्हते तर ती का उठली जागेवरून अर्ध्या तासापूर्वी? काय म्हणून, आणि अजून उतरलीच नाही, बरं उठायचं होते तर, ती आलेली प्रचंड बाई, तिला का नाहि सांगितले उतरायचंय ते? का नाही, आता इथेच का थांबली असेल, मलाच का दिले बसायला?? एक ना अनेक प्रश्न !!

जाउदे ! असे म्हणून जेव्हा ही station वर उतरायला जाणार तेव्हा मागून हळूच ती आली आणि तिने हीच्या डोक्यावरून हात फ़िरवला, अगदी मायेने, पण तरीही ती हसली नाही,.....हसता येतंच नाहि अशी ती..

आता ही पण खाली उतरली, ती अजूनही train मध्ये होती, ती उतरलीच नाही, म्हणजे तिला आपल्यापेक्षाही पूढच्या station वर उतरायचंय तर!
मग ती का उठली? न हसता कशी जगत असेल ही, हात का फ़िरवला माझ्याच डोक्यावरून, असे प्रश्न स्वतःला विचारत तिने rikshaw पकडली.. आणि ती ्न हसणारी हिच्या तोडांवर एक हास्याची लकेर उमटवून गेली, कायमची.....

हर्षदा !!

ता.क. ती तिला वाईट म्हणणारी "हि" मीच होते, माणसं न ओळखता येणारी मी!

6 comments:

Ranjeet said...

सुंदर कथानक.. तू खरंच अनुभवलयस..??

Sarang Bhanage said...

खुप sensitive आहेस. ते जप. आणी हे सगळे क्षण ही मनात कायम जप.
तुझ्या लिखाणाच कौतुक का करू? ते करणारे शेकडो असतील. आणी एव्हढ चांगल लिहिणारे ही पुश्कळ असतील खचित.
पण तुझा मनस्वी पणा आहे ना, तो खुप महत्वाचा आहे. काळ तो बोथट करतो ग. तो जप. नीट जप.

Harshada Vinaya said...

हो रणजीत अनूभवलय...

॒ सारंग दादा, खरे आहे तूझे "काळ मनस्वीपणा बोथट करतो" पण असे होऊ नये याचा प्रयत्न करेन,
कदाचित नाही बोथट होणार तो, कारण ती निव्वळ
लेखनशैली नसून स्वभाव आहे!!
प्रयत्न करेन !

Raj said...

sundar anubhav! aavaDala!

संदीप said...

Nice ...vapu saangataat more and more you write personal it becomes more and more universal..
pratyay aalaa tujhyaa kathetun...

लक्ष्मीकांत said...

आवडलंच !