October 14, 2008

ती....

ती तशी अनोळखी, कारण तिचं नावही माहीत नाही मला !! पण मनात रूतून राहीली ती कूठेतरी.. आता poverty वर लिहायला घेतले आणि ती परत आठवली..

ती..

मी शाळेतून ज्या रस्त्याने यायचे, त्या रस्त्यात एक मैदान लागायचे, तिथे कधी मधे वर्षातून एखादा कार्यक्रम झाला तर व्हायचा! बाकी मात्र झोपड्यांचे प्रस्थान.. तिथेच दिसायची ती..
ती.. काळ्या कूळकूळीत रंगाची, पण विशेष चमकदार डॊळे ! कधी साधा फ़्रोक, तर कधी जे दिसेल ते गूडांळून बसलेली, माझ्याच वयाची, तिचे नाक मला माझ्यासारखे वाटायंचं, हे तिच्याबद्दलच्या आकर्षणाचे मूख्य कारण.

ती रोज दिसायची, मी तिच्याकडे आणि ती माझ्याकडे अगदी बराच काळ रोखून बघायचो, मी अगदी तीच्या द्रूष्टीआड होईपर्यंत ती पाहत असायची.

ती काय खात असेल?, काय पित असेल?, तिचे आई बाबा कोण असतील?, शाळेत जात असेल का?, तिला आवडेल का शाळेत जायला? इथपासून ते तिला मासिक पाळी येत असेल का?.. असे अनेक प्रश्न मनात घोंगावायचे माझ्या !!पण कधीच काही विचारलं नाही!
मी रोज शाळॆत, "आज तिला हा प्रश्न विचारायचा" असे ठरवून यायचे.कधी छानसा पदार्थ डब्यात असला की थोडा राखून ठेवायचे,जसे मैदान जवळ येइल तसे डबा काधून हातात घ्यायचे, पण तिच्यासमोर कधी उघडलाच नाही !! कधी मान वळवून तिच्याकडे पाहून हसलेही नाही.

असा खेळ सतत तीन वर्ष चालला.. मी आठवी ते दहावीत जाईपर्यंत !! मग शाळा सूटली आणि तो मार्ग सुदधा !
मध्ये तीन वर्ष लोटली !!

एक दिवशी अचानक PACE मधून घरी येताना ती दिसली, अरे हो! तीच होती, पण आता तिने फ़्रोक घातला नव्हता, एक लांबच्या लांब कपडा साडीसारखा गूंडाळला होता, तिच्या वाढलेल्या पोटाच्या आकारावरून आणि तिच्या कमरेवरच्या शेंबड्या, आणि नागड्या पोरावरून मला काय तो अंदाज आला...

तीने ही मला ओळखले, आणि त्या दिवशी इतक्या वर्षात पहील्यांदा हसली !!

आमचा बराच काळ शब्दांवीना संवाद चालला होता.. माझा व्याकूळ चेहरा बहूतेक तिला विचारत होता,"तू?, इथे कशी?,ते मैदान सोडले?, लग्न झाले तूझे?, ती मूलं तूझीच का गं?" तिचा चेहरा मात्र काहीच बोलत नव्हता !!

तेवढ्यात मागून एक पोरकट पण दारू पिऊन अंग सूजलेला एक माणूस (कि मूलगा) आला. त्याने जोरात तिच्या पाठीत एक धपाटा टाकला, ती कळवळली आणि मी ही!!

ती रागाने त्याच्याकडे बघू लागली तर त्याने जोरात तीला पूढे ढकलून, "इथे काय थांबलि? पूढे चल !" असे सूचवले.

ती गेली, आज ती माझ्याकडे मी जाइपर्यंत पाहत नव्हती, आज ते मी करत होते !!

कूठे असेल ती आता? असेल कि नसेल? किती मूलं असतिल एव्हाना तिला? आणि तो तिचा नवरा (कि अजून कोणी) त्रास देत असेल तिला? तीला येत असेल माझी आठवण? मी इथे तिच्याबद्दल सगळ्यांना सांगतेय,हे तिला कळले तर ती काय म्हणेल?

हर्षदा...

6 comments:

HAREKRISHNAJI said...

you write so well

sonal said...

khup sundar ahe.pan kharach ashi mulagi hoti ka?????mag shaletun jatana aamhala kadhi ka nahi dakhavlis jar dakhvli astis tar aaj tuzi kavita ajun jast kalali asti........

Harshada Vinaya said...

@ harekrishnaji thanks..
@ sonal,
hoti ashi....

Ranjeet said...

अशी खरंच कुणी होती की नाही.. हे महत्वाचं नाही.. पण एक गोष्ट नक्की.. U write ur heart out..

लक्ष्मीकांत said...

मस्त आहे, कुठे छान आहे वगैरे कॅटेगरीत हे लिखाण बसेल असं वाटंतच नाही. ज्या पद्धतीनं "त्या" मुलीचं आयुष्य मझ्यापर्यंत पोचलं त्याला खरं वाखाणावं लागेल. मी ह्या साऱ्या प्रकारच्या अनुभवांना सामोरा गेलोय म्हणूनच त्यांचं इतकं थेट चित्रण मनाला जास्त भावलं असेल.

Anonymous said...

loka ya mulibaddal lihnaari ya 'muli' la yevdha prem ka kartat?