October 22, 2008

दिवाळी (???)

दिवाळी जवळ आली नाही का?

मग गेली तिही खरेदीला,
बरेचसे पैसे घेऊन, बरेचसे !!
शिरली एका मोठ्याशा दूकानात,
स्वतःचे कपडे घेता घेता हळूच,
वाकून पाहत होती, पलीकडच्या,
"men's section" मध्ये,
तिथे न्याहाळत होती अधिक तन्मयतेने!
"कोणता रंग उठून दिसेल तूला?,
हा असा shirt आवडेल तूला?"
विचारत राहीली मनातल्या मनात..
शेजरी कूणीही नसताना....

कपड्यांची संपली तशी मिठाई खरेदी..
बघितली चाखून एकेक मिठाई,
गोड मूळी आवडतच नाही तिला,
तरीही सर्वात गोड चव असलेलीच घेतली..
"तूला आवडतं ना गोड फ़ार.."
परत म्हणाली मनातल्या मनात..
शेजरी कूणीही नसताना....

मग दिव्यांची खरेदी,
रांगोळीची,
फ़टाक्यांची,
दागिने.. सगळं स्वतःसाठी,
पण त्याच्या आवडीने,
मनातल्या "त्याला" विचारून !!
शेजारी कूणीच नसताना...

फ़िरत राहीली बाजारात,
प्रचंड गर्दीत, इथून तिथून धक्का घेत.
तरीही बधिर- शरीर आणि मनही..

विकत घेता आला असता सगळा बाजार,
इतके पैसे पर्समध्ये होते तिच्या..
तरी खरेदी अपूर्णंच,
"भंगलेली स्वप्न"फ़ार महाग असतात म्हणे...

हर्षदा (२२ ओक्टो. २००८)

4 comments:

Aniket said...

Nice poem but a bit 'Nirasha wadi'

why bhangalele swapna?

anyway happy divali.

regards,
http://www.blogger.com/profile/16412965243968410816

Remigius de Souza said...

अशा कितीक हाडामासाच्या मन संवेदनांच्या या अर्ध्या - मुर्ध्या राहिलेल्या जीवंत कविता समाजात वावरत असतील?
त्यांचे तुम्ही केलेले हे हळुवार चित्रण फार आवडले।

Harshada Vinaya said...

@ aniket.. nahi nirasha vadi nahi ....

@ remi.. khare aahe ! boss !!

Anonymous said...

dhaatpane ek comment tumhala- vaieet ahe kavita