November 1, 2008

'ओंजळभर पाणी

ओंजळभर पाणी
खूप तहान लागलीये, हो ना?
ह्म्मं..मलाही, या वाळवंटात,
चल,आपणच खोदूया एक विहीर,
आपल्या दोघांसाठी,खोल-खोल..

मी माती सारते बाजूला थोडी,
मग तूही सार माती थोडी,
मग मी सारेन मोठाला दगड,
तूही कर तसंच,अगदी तसंच..

आलटून-पालटून, आळीपाळीने,
आपण सारत राहू एकेक सगळं
खूप खोल खोल जाण्यासाठी..

मग कूठेतरी लागेल ओलावा,
उत्साह दूणावेल आणि तहानही..
अचानक हाताला लागेल थोडंसं पाणी,
अगदी थोडं-थोडकंच हं...!!!

उडवून पाहीन मी ते पाणी,
तूझ्या नाक,गाल, ओठांवर,
शहारशील तू कदाचित, अचानक,
पण ओठ जरा जास्तच हपापतील..

तूझा उजवा हात दे अन माझा डावा घे,
बनवू आपण 'दोन' हातांची 'एक' ओंजळ,
दोन हातांची नि दोन जीवांची..एकच ओंजळ.

ओंजळीत घेउ ते थोडं-थोडकं पाणी,
येउ इतके जवळ की भिजून जाउ दोघंही !
त्या ओंजळभर पाण्यात, चिंब चिंब..
-------------------------------------------
---------------------------------
भिजून झाले आपले चिंब चिंब,'
की होतील कधीतरी श्वास थंड,
मग आवरून घेऊ...
बाजूला सारलेलं सगळं..
परत तसंच आळीपाळीने !!
एकेक दगड रचत राहू..

सगळं सावरून मग येऊ,
त्या 'खोलातून' 'जमिनीवर'.
एकमेकांकडे पाहून किंचित हसत!

रोवू एक 'मैलाचा दगड' त्या जागी,
जिने पूरवले 'एक ओंजळभर पाणी'
निघून जाऊ पूढे, आपापल्या वाटेवर,
कदाचित वेगळ्या,हातातला हात सोडून,
एकमेकांकडॆ मागे वळूनही न पाहता..

मी मात्र पाहीन वाट,
कधीतरी वळणं घेतील वाटा,
छेदतील एकमेकांना, 'चूकून.'.
'ओंजळभर पाणी' पूरवण्यासाठी !!!

हर्षदा .. (२७ ओक्टो. २००८)

9 comments:

Innocent Warrior said...

Too good.

Innocent Warrior said...

Hi, thanks for visitng my blog, i have visited your second blog, its awesome. I have another blog in english

http://ideafest.blogspot.com/

Do Come!!!

आशा जोगळेकर said...

फारच छान, थोडेसे थेंब मला ही मिळाले. हो अन् माझ्या ब्लॉग ला भे़ट दिल्या बद्दल धन्यवाद .

HAREKRISHNAJI said...

kya baat hai

Mohan Lele said...

तूच तूझ्या जिवनाची शिल्पकार!
तूझे सर्व ब्लाँग वाचल्यावर तूझ्यातील होणारे बदल सहज जाणवून जातात. तू्झ्यातील शिल्पकाराला आता साथीला हात हवा आहे, म्हणते आहेस.. भले तो दूर जाईल... परत भेटण्यासाठी... रेषा छेदण्यासाठी!
वा फारच छान!संवेदन शील मना्ची शब्दात उमटलेली पावले, वेगळ्या वाटा निर्माण करून जातात.सतत लिहीत रहाण्यासाठी शुभेच्छा!!!!

Harshada Vinaya said...

@ Innocent Warrior,आशा जोगळेकर..HAREKRISHNAJI :-
thanks! :) dil se !!

@ Mohan Lele
कवितेबरोबर कवीलाही ओळखण्यासाठी धन्यवाद!

Veerendra said...

मी मात्र पाहीन वाट,
कधीतरी वळणं घेतील वाटा,
छेदतील एकमेकांना, 'चूकून.'.
'ओंजळभर पाणी' पूरवण्यासाठी !!!


vaa .. surekhach !

......वैभव....... said...

hi kaay kavita aahey !!!!
ultimate ga....
mala faar aavadli
thanks lihilya baddal

लक्ष्मीकांत said...

आहाहा... मार डाला... खरंच !