देहाला हवेसे,
सूखी कवडसे,
तरी मागतसे,
सुख-सुख !
सुखाला म्हणावे,
कूठून व्याख्यावे,
अनादि अंतिम,
सूख-सूख !
व्याख्या कठीणंच,
संदर्भ देहाचा,
मोजणे अशक्य,
सूख-सूख !
कसे समजावे,
जेव्हा उमजावे,
देहा विसरावे,
सूख-सूख !
देहाचा वापर,
माध्यम केवळ,
कळून उरावे,
सूख-सूख !
भोग भोगायचे,
इतूके कामाचे,
आत्म्यास पूजावे,
सूख-सूख !
अंतरी वसावे,
उच्च पूजनिय,
दाविले पल्याड,
सूख-सूख !
बंद डोळ्यांमाजी,
दिसला प्रकाश,
जाणावे तेचहे,
सूख-सूख !
बाजूला विरळ,
हवाही चपळ,
डोळियाचे पाणी,
सूख-सूख !
आभाळीचा सूर्य,
तांबडे आकाश,
शहारले अंग,
सूख-सूख !
मंदिराच्या पायी,
लाविली तंद्रीही,
शूद्ध हरपली,
सूख-सूख !
असेही सूखात,
भोगियले आज,
वसला मनात,
सूख-सूख !!
नास्तिक मनात,
फ़ूलवल्या आशा,
प्रिय परमेशा,
सूख-सूख !!
हर्षदा..
ह्म्म्म... सूख- सूख

3 comments:
March 9, 2009 1:30 PM
hi kavitra vahchana he hi ek sukh aahe. Nehamichya shabdanpeksha vegali, saglyanchya watnichi nahi hi kavita. Pan mi tyatla aananda samju shakto, mhanunach he khas abhinandan.
March 25, 2009 1:44 AM
Vichaar chaan maandales... Kavitaa cum THOUGHTS vaatatat...
Aavadali kavitaa!
May 12, 2010 9:19 PM
सूख सूख सूख... आपला विचार अगदी तस्साच दुसऱ्यात दिसतो तेंव्हा ते खरंच सूख सूख सूख...
मला कविचा-लेखकाचा स्वभाव समजून कविता वाचायला आवडतं.म्हणूनच मी अगदी पहिल्या post पासून वाचायला सुरवात केली आणि असं वाचायचं सुचल्याबद्दल आता स्वत:वर खूष झालोय.... तुझ्या लेखनात इतकं डोकावू दिल्याबद्दल खरंच धन्यवाद.
Post a Comment