February 24, 2009

शून्याचा काळ

.जेव्हा रात्री जास्त जागतात,
आणि पहाट लवकर उठते,
तेव्हा मध्येच निपचित पडतो,
तो फ़क्त "एका शून्याचा" काळ...

मग तो शून्य पांघरून घ्यायचा..
अंगा-खांद्यावर, डोक्यावर...
आत शिरायचे त्याच्या..
त्यालाच त्रिमीतीय बनवून..
आणि शिरलो त्या पोकळीत,
कि आपणंही निपचित पडायचं..
त्याच्यासारखंच.. निश्चिंत..शांत..
काळाला मागे टाकत....
...........
..............
पोकळीत शिरणं आणि
निपचित पडणं...
घेऊन जाते शून्याच्या ..
त्रिमीतीच्या पलीकडच्या..
चौथ्या मितीत...
काळाला जिथे मागे टाकून..
डोळे बंद करून..
शिरते त्या "मंद" अवस्थेत..
तेव्हा काळाची चौथी मितीपण हरते.
. माझ्या निगरगट्टपणापूढे..
शांत, निंवात, बंद डोळे....
आणि ती तंद्री मोडण्यासाठी..
आसूसलेले माझ्या मनातले विचार..
ही अजून पाचवी मिती....
नालायकशी.. चौथीवर स्वार होऊ पाहणारी...
पण छे !! आता शक्य नाही..
शून्य अजून लहान लहान होतंय..
पाय आता पोटाशी घ्यावे लागतायंत,
मान खाली वाकवावी लागतेय..
पाठीला बाक आणून एक गोल बनलायं..
माझाचं.. शून्यासारखा...
आता शून्य बिंदू होऊ पाहतोय...
आणि मग पूढे.. "nothing" होऊ पाहतोय..
छे !! आता मागे वळणे नाही..
आता ते शक्यंच नाही..

हर्षदा विनया.(२४ फ़ेब्रू. ०९)

6 comments:

Innocent Warrior said...

ek number

Archetypes India said...

हर्षदा,

"ॐ" जसा संकेतचिन्ह तसाच "शून्य" - "बिंदू" पण. ही स्थिती बहुतेक सर्वच पौर्वात्य संस्कृतिंत मान्यवर आहे. संगीतात मौनाचे (silence) जे स्थान तेच शून्याचे अध्यात्मात - असा आपला माझा समज!! सागरावर लाटांचे तांडव अथवा खळबळ चाललेली असेल पण खोलवर अंत त्याचा मागमूस पण नसतो. अशी मानसिक अवस्था असते शून्याचा अनुभव घेतला की. तीच शून्यावस्था (Inner Void). अध्यात्मावर कितीही वाचले वा ऐकले तरी जे शक्य होत नाही ते या कथेने / कवितेने साधले.
इथे वय, लिंग, जात, धर्म, स्थान... कशाचीच अडचण येत नाही.

--- रेमी

Harshada Vinaya said...

अभिजीत आभार.
॒ रेमी, हा शून्य अनूभवणं आणि तसाच अनूभवत तो जपत राहणं या सारखं दुसरं exploration नाही..तूमचे आभार तूम्ही ते उत्तमरित्या समजून घेतलंत..

Vijay Kumar Sappatti said...

hi

i visited first time on your blog .

This is really one of the great work , i cam e across. I really liked this poem.

mala jaast marathi nahi yete , par mala samajhto ,as I am from Nagpur.

thanks . Please visit my poem blog to read new poems : www.poemsofvijay.blogspot.com

regards

vijay

Vishwas said...

Ultimetum yaar,
u r really gr88888888

लक्ष्मीकांत said...

आत्मशोधाचाच भाग आहे तो.... पण मांडणी पेक्षाही त्या मागचा विचार जास्त भावला...