March 3, 2009

माझं मन.. !!

"mind manifests itself as
the stream of consciousness"
पूस्तकातली व्याख्या घोकून,
जेव्हा पूस्तक बाजूला ठेवलं..
आणि खिडकीतून बाहेर पाहीलं..
चांदण्यांनी भरलेलं आकाश दिसलं..
एकेक चांदणी गलोलीने पाडावी वाटली..
आणि कळलं पुस्तकाच्या व्याख्येच्याही..
पलीकडॆ आहे वेडं मन !!

कधीतरी वाटतं, मोठ्याश्या oysterमध्ये,
वाळूसारखे अलगद शिरलो..
तर आपला पण मोती होईल?
कधी कधी वाटतं..
जगातली सगळी फ़ुलं,
पांघरली अंगावर तर...
मी सुगंध मिळवेन कि ते?
हसरं हसरं फ़ूलपाखरू उडताना पाहीलं,
कि पाठ चाचपून पाहाविशी वाटते..
चूकून एखादा तरी पंख फ़ूटला असेल तर
आणि कळतं,
पूस्तकाच्या व्याख्येपलीकडचं माझं मन !!
एकटं असलं तरी सोबत करतं,
जीवनाच्या असंख्य आयामांतून फ़िरवते..
देह स्थिरावलेला असला तरी..,
कधी बाबाच्या मांडीवर डोके ठेवून येतं,
कधी प्रियकरच्या गालाला गाल घासून येतं,
कधी अवकाशातून हूंडारत राहतं....
आकाशगंगा सोडून उगा देवया्नीच्या वाटेला जातं..
आणि कळतं, व्याख्येपलीकडंचं मन !!

हसता हसता डोळे ओलवून टाकतं,
पडता पडताच "उठ" म्हणून सांगतं..
स्वतः हरवते पण मला सावरतं..
असं व्याख्येपलीकडचं मन !!

या गर्दीत वास लागल्यासरखंच..
"माझ्या" माणसांकडॆ ओढ घेतं..
मुक्ततेच्या व्याख्येत जाणीवांना बसवते..
आणि मजेमजेतंच अद्वैत शिकवतं...
सगळं so called "माणूसपण" बाजूला ठेऊन,
"माणूस" नावाचा प्राणी बनून जगायला शिकवतं..
जगण्यातला रस पिताना..
सगळॆ आडपडदे दूर टाकायला लावतं..
तेव्हा कळतं, व्याख्येपलीकडंच माझं मन!!

वाकूल्या दाखवत स्वतःच,
कोडे बनून उभे राहते....
"चल बघू सोडव मला"...
आणि कळता कळता हातून निसटतं..
असं व्याख्येपलीकडंच माझं मन !!

हर्षदा विनया...

11 comments:

Dipali said...

khupch chaan h Harshada...

वाकूल्या दाखवत स्वतःच,
कोडे बनून उभे राहते....
"चल बघू सोडव मला"...
आणि कळता कळता हातून निसटतं..
असं व्याख्येपलीकडंच माझं मन

kiti satya aahe he....pathal..aavadal...

Innocent Warrior said...

Sundar!!!

Archetypes India said...

हर्षदा,
अगदी माझ्या मनातलं बोललात.
-- रेमी

Archetypes India said...

व्याख्या, मग त्या कशाच्याही असोत,
वस्तुस्थितीला मर्यादा घालतात.
"H2O" पिऊन कुणी जगू शकेल का?

IEN said...

"हसरं हसरं फ़ूलपाखरू उडताना पाहीलं,
कि पाठ चाचपून पाहाविशी वाटते..
चूकून एखादा तरी पंख फ़ूटला असेल तर"

Harshada, Khupach chaan aahe kavita. Kalpanaaani purna tari hi khari khuri.

Lihit raha.

Harish Potdar said...

"हसरं हसरं फ़ूलपाखरू उडताना पाहीलं,
कि पाठ चाचपून पाहाविशी वाटते..
चूकून एखादा तरी पंख फ़ूटला असेल तर"

Harshada, Chaa njamli aahe kavita. Kalapana khup taral aahe. Lihit raha.

आशा जोगळेकर said...

हसता हसता डोळे ओलवून टाकतं,
पडता पडताच "उठ" म्हणून सांगतं..
स्वतः हरवते पण मला सावरतं..
असं व्याख्येपलीकडचं मन !!

सुंदरच.

Harshada Vinaya said...

धन्यवाद :)

सत्यजित माळवदे said...

ulti ahes tu.. mstach

लक्ष्मीकांत said...

खूप सुंदर लिहिलं आहेस... बकीचं बाकीच्या लोकांनी लिहून ठेवलं आहेच... मी दुसरं काय बोलणार ?

Medha said...

Vyakyet mavat nasale tari ..Kitti sunder pakadale ahes bar manala kavitet :) khupch surekh g..

चूकून एखादा तरी पंख फ़ूटला असेल तर..
hey khup bhidale ..