March 26, 2009

थेंब

ट्प ..
मंदसा नादावला
आणि
एक थेंब बरसला..
कपाळाच्या मध्यभागी...
झाली जाणीव ओली..

सरळ पाझरत आला..
नाकाच्या टोकावर..
मीच त्याला सावरून,
धरल्यासारखा...
शांत.. संथ..

दूसरा थेंब ...
गालावर ओघळला..
गूदगूल्या करीत..
पूरेपूर जाणवला..
पळत आला खाली,
भिजवली हनूवटी,
जशी स्पर्शीली ..
मायेने कूणीतरी...

तिसरा थेंब हातावर..
थोडासा जोरात..
मोती बरसावा तसा...
मी पटकन ओंजळ बनवली,
सारे मोती साचले तळहाती...

मग पिऊन घेतला थेंब थेंब,
आणि ओठांनाही झाला स्पर्श..
कूणाचीतरी,
बोटं फ़िरल्यागत...

असा एकेक थेंब बरसत राहिला..
भिजवत राहीला...
ट्प ट्प नादावत राहिला..
आणि मी भिजल्यावर,
मीही पाझरले.. डोळ्यांतून..
काही थेंब माझ्यातही पाझरले..
चेह-यावरच्या,
त्या थेंबांशी एकरूप होत...
सारे थेंब थेंब भरून राहीले माझ्यात...
आता.. मलाही बरसायचंय..
कूणावरतरी..
बरसायचंय मलाही..
बरसायचंय..

हर्षदा विनया.
(मार्च २००९)

4 comments:

Narendra Damle, words to speak and a heart to listen said...

एक थेंब आला
कपाळावर उतरला
बाजूला साकून हळूच
तुझ्या डोळ्यांत मिटला
भेट भेट भेटून तो
डोळ्यांच्या कडांवर आला
ओलावल्या पापण्यांना
ओला निरोप दिला

निघता पाय निघेना
बाहेर काही दिसेना
आत गेला कोण
बाहेर येतोय कोण
काहीच मुळी कळेना

Mrs. Asha Joglekar said...

पावसाचे हे थेंब जेंवहां मनांत उतरतात तेंवहा डोळ्यतून ठिबकणा-या थेंबांशी एकरूप होतात .
सुंदर कविता.

लक्ष्मीकांत said...

सुंदर...

उर्मी said...

छान आहे कविता. साधीशीच. पण आशय पूर्ण.