February 6, 2010

एक अनूभव

माझा पहीला 'village stay'. .
पहील्यांदाच असं एकटीने जाऊन गावात राहायचं, म्हणून थोडी धाकधूक होतीच. त्यात वेगळी संस्कॄती, वेगळा समाज, वेगळ्या चालीरीती.. ह्या सा-यात कुठे सावरेन स्वतःला हा प्रश्न होताच मनात!
तेव्हाचा हा अनूभव..

गावात आम्ही शिक्षणाच्या सुविधांचा अभ्यास करत होते. मुलांची गळती, मुलींचे प्रमाण, सुविधा, government schemes, SSA, आंगणवाडी, लोकांमधली जागरूकता, असलं काही बाही ;)

लोकांशी गप्पा करता करता एकदम एक वाक्य कानावर पडलं, "तिथं मांगवाड्यात एक आगळंच पोर आहे बाई"
’आगळंच पोर’? काय म्हणायचंय नक्की? प्रश्न उठला एकदम मनात!
आम्ही पोहोचलो तिथे.
फ़ार शोधाशोध नाही करावी लागली. गावाच्या अगदी टोकाला एक नवीन ’वेगळा गाव’ सुरू होतो. अंतराने फ़ार दूर नाही पण देवाणघेवाणीसाठी मात्र फ़ार दूर.

काळ्या काटक्यांची घरं होती तिथे, घराजवळंच म्हशी आणि शेळ्या बांधल्या होत्या जणू घराचाच भाग असाव्या. काही नागडी आणि शेंबडी पोरं इथून तिथून पळत होती. म्हातारी माणसं टोपल्या विणत खाली बसली होती. वय वर्षे १५ ते ५० मधलं कूणीच नव्हतं तिथं. बहूतेक कामाला गेली असावीत माणसं.
मी सहज लोकांशी गप्पा मारायला सूरूवात केली. मग हळूच तिथल्या मुलांच्या चौकश्या करायला सूरूवात केली. एक आजोबा मध्येच कुठेतरी बोट वळवून म्हणाले,’ ते बगा ते पोर कसं जनमलंय!’
मी नजर वळवली.
तो.. तो साधारण ८-९ वर्षांचा मूलगा, अंगात मळलेले कपडे, पाय पसरून खाली बसलेला, अंगाला चिखल लागला होता, नाकातून आणि डोळ्यातून पाणी गळत होतं आणि तो ह्सत होता. त्याचं ते हसण्ं पाहून लक्षात आलं.
He was a special child, with very high degree of mental retardation.
ह्म्मं...
मी त्याच्याकडे पाहून एक smile दिले. त्याने प्रतिसाद दिला नाही.
परत ह्म्मं...
"तुमी पन फ़ोटो काडायला आलाव काय?" एक प्रश्न माझ्याकडे रोखून आला.
"नाही" मी उत्तरले.
परत ह्म्मं...

त्याच्या जवळ गेले. त्याने रोखून पाहीलं. त्याच्याकडे नीट पाहीलं. त्याचा पाय बांधून तो म्हशीच्या खुटांला बांधलेला. मी त्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहतेय हे पाहून ते आजोबा म्हणाले,"तेचं आई बाप कूनी नसतंय तेच्या बरोबर, ते कामाला जातायंत"
"ह्म्मं" मी.
मी उद्या येते. असं म्हणून मी निघाले.

येताना परत "ह्म्मं" चा पाढा म्हणत होते.
ह्म्मं एके ह्म्मं
ह्म्मं दूणे पण ह्म्मं
ह्म्मं त्रिक पण ह्म्मंच.. दमले बाई !!

दुस-या दिवशी परत गेले. आज त्याची आई भेटली मला. ’त्याला special school मध्ये पाठवण्यासाठी काही करता येईल का?’ याबद्दल त्यांच्याशी बोलायचं असं ठरवलं.

’कशी काय काळजी घेता त्याची?’ मी.
"सगळंच बगायला लागतंय, तेचं हगणं मुतणं बी कळंना बगा तेला" शेजारची एक बाई. (प्रश्न त्याच्या आईला विचारला होता)
"तूमच्या कामाच्या वेळी मग?" मी.
"मंग काय? तेला बांधतात ते इथं" परत तीच बाई.
"तुम्ही काय करता काकू?" मी (नीट त्याच्या आईकडे पाहून)
" इथंच मजूरीच्या कामाला जाते" त्याची आई.
मग थोडा वेळ त्यांच्याशी बोलले. तो त्याच्या आईच्या पायाशी लोळत पडलेला होता. माझ्याकडे मधे मधे पाहून हसत होता. आणि मी ही.

मग मी रोज त्यांच्याकडे रोज जायला लागले, त्याच्याशी खेळायला!
हळूहळू त्याच्या पालकांशी त्याला special school मध्ये पाठवण्याबद्दल बोलतंही होते. पण त्या गरीब बिचा-यांचे प्रश्नंच वेगळे होते. अशा काही शाळा असतात तेच मूळात त्यांना पटेना. असल्या तरी तिथे त्यांच्या मुलाची काळजी कुणी काळजी घेईल का, हे त्यांना कळेना.

कधी कधी मला हे so called 'अडाणी’ पालक अधिक शहाणे वाटतात. small family च्या नावाखाली मुलांची abortions करणा-यांपेक्षा हे जे मूल पदरात पडलंय ते देवाचं देणं म्हणून काळजी घेणारे अधिक शहाणे! किंवा अधिक चांगले.

हळूहळू ते convince होत गेले पण आपल्या मूलाकडे बिलकूल डोकं नाहीये, त्याचं कसं व्हायचं हे होतंच मनात.

काही दिवस गेले यात. माझा परतायचा दिवस जवळ आला. निघायच्या २ दिवस आधी मी त्याच्या घरी गेले होते. बसले. गप्पा मारल्या. चहा घेतला. खेळले. आणि निघाले. त्याला हात हलवून 'bye’ केले. वळले. तर मागून रडायचा आवाज आला. परत वळले.
तो पायांवर घासून घासून मागे येत होता. मी त्याच्या कडे चालत गेले, समोर उभी राहीले. त्याने माझ्या कमरेला मीठी मारली.
मी गप्प....
तो रडतंच होता. मी खाली बसले, त्याच्या जवळ गेले. तो शांत झाला.
मी त्याच्या आईकडे पाहीलं. म्हणाले, "कोण म्हणतं याला काहीच कळत नाही"
त्याच्या डोक्यावरून हात फ़िरवला आणि वळून निघाले. तो रडत होता. तो रडतंच होता.

परत ह्म्म्मं...पण वेगळा..
आता त्या पाढ्यात ’ह्म्मं’ दूणे ’ह्म्मं’ नव्हतं.
त्या ह्म्मं च्या निराशेपूढे पण काहीतरी सापडलं होतं मला....

Mental disabilities are not just individual's problems. Society makes it a complete complex situation. Not just consequences but causes are also deep rooted in the social conditions of a particular individual/family/community. (Will be discussed in the next blog post)
Impairment may not have way out but disability has. Biology gives explanation of impairment but feeling of disability is formulated in society.


हर्षदा विनया

ഹര്ഷദാ വിനയാ