May 27, 2010

kshan

Kshan

Ek kshan vijala hota
Doosra kshan magat hota
Teesrya kshanani vaat pahili
Chauthya kshanat shwas bharla
Pachva kshan nakosa vaatla
Sahava kshan adhik nako
Saatvya kshanat jeev tutala
Aathva shan................?

Kshan kshan bhijala
Kshan kshan mojala
Kshan kshan rujla..

May 4, 2010

आवाज

या पायवाटेच्या कडेला एक उंचवटा आहे, छोटी टेकडी वाटावा असा. त्यावर छोटी झोपडी आणि बाजूला दोन चिंचेची फ़ार जूनी आणि मोठी झाडं.त्यातल्याच एका चिंचेच्या झाडाखाली बसले होत,एका लोखंडी पट्ट्यापट्ट्यंच्या पलंगावर. बसले नव्ह्ते तशी, आडवी पडले होते,पाय कडांवरून घरंगळत सोडून,वर आकाशाकडे पाहत..संध्याकाळचे सात वाजून गेले होते.
ती झाडं फ़ारंच जूनी वाटत होती. एकेक खोड साधारण १ मीटर व्यासाचा असावा. उंच वाढलेली आणि असंख्य फ़ांद्या असलेली ती झाडं घेरून राहीलेली. दोन झाडांचे बुंधे मला घेरून राहीले होते जमीनीवर. एक उजवीकडे अन दुसरा डावीकडे आणि अक्राळविक्राळ वाटणा-या त्या फ़ाद्या आभाळ व्यापून राहीलेल्या. वर दिसणारं करड्या रंगाचं आभाळ पण या झाडांच्या इवल्या इवल्या पानांच्या आडूनंच आपलं दर्शन देत होतं. करड्या background वर ही दाट हिरव्या-काळसर रंगांची पानं. खूप बारीक बारीक नक्षी, वळणावळणाच्या रेषा,रंगाच्या छटा आणि भावनांच्या पण...
मी वर पाहत होते, मग उजवीकडे, मग डावीकडे... मला भिती वाटायला लागली होती एव्हाना.. कसली कोण जाणे?
दुरून कुठून तरी बकरीच्या "बें बें’ चा आवाज आला आणि नजरेच्या खेळाला कानाने शह दिला. मग अजून अजून आवाज ऐकू यायला लागले. कुठेतरी नमाज सुरू होता. कुत्रा.. कुत्रा भुंकतोय का तो? पण फ़ार दुरवर कुठेतरी. .." बें अल्लाह भौ अकबर बें भौ बें..."
खुप आवाज होते. पानांची सळसळ (मघापासून त्यांच्या आवाजाकडे लक्षंच गेलं नव्हतं) "वारा सूटलाय का?, बकरी का ओरडतेय? नाही! हे तिचं कोकरू आहे.. हो! हा तिचा आवाज आणि हं.. हा.. हा तिच्या कोकराचा.. कुत्रा.. भुंगा.. सायकलला वंगण हवंय कुणाच्यातरी...बकरी थांबत का नाहीये, त्यांचा कळपंच आहे का हा? काही बोलतायंत का त्या? शी! हि पानं कसली कटकटी आहेत, काही ऐकूच द्यायची नाहीत नीट.. मला ऐकायचंय.. मला ऐकायचंच खुप काही"

मी माझा श्वास ऐकला. १, २, ३, ४,........
.
.
. आठ वाजत आले होते. एक हाक आली. उठले.. मी बहूतेक कुशीत शिरले होते स्वतःच्याच...

हर्षदा