February 13, 2011

माती

माती ..भुसभूशीत
लुसलुशीत पण अबोल माती..
कोणत्यातरी साच्यात
स्वतःला बसवू पाहणारी माती..
साचे निराळे.. कधी पुरूषी तर कधी स्त्रित्व दाखवणारे..

स्वतःला साच्यात बंद करून,
गुपचूप त्याच्या कूशीत ..
निजू पाहणारी माती..
साच्याचा नवीन आकार मिळेल,
असे स्वप्नेरी स्वप्न लपवून जगणारी माती..

जिवाच्या आकांताने,
जखमा खात,
साच्यात मावू पाहणारी माती...

धडपड धडपड .. अविश्रांत धडपड..
साच्यात मावण्याची..

पण प्रत्येक वेळी,
साचा उपडी केल्यावर..
पुर्वीसारखीच भूसभूशीत
खाली कोसळणारी माती...

स्वतःला कोणताच आकार,
न देऊ शकलेली..
कोणताही साचा आपला,
न म्हणू शकलेली..
थकलेली, विफल माती..

हर्षदा विनया

8 comments:

manoj said...

Hey... must aahe .. baryacha divasatun vachal...

भानस said...

माती मातीची वेगळी वेगळी कहाणी.... !!

छान!

प्रशांत दा.रेडकर said...

हर्षदा कविता छान आहे ग :-)
माझ्या ब्लॉगचा पत्ता:http://prashantredkarsobat.blogspot.com/

आशा जोगळेकर said...

स्वतःला कोणताच आकार,
न देऊ शकलेली..
कोणताही साचा आपला,
न म्हणू शकलेली..
थकलेली, विफल माती..
वा, काय कविता आहे ।

BinaryBandya™ said...

chhan aahe kavita

......वैभव....... said...

kavita aavadali.
"i don't want not to belong to some group."
i hope i am getting this right. isn't it about your individuality? that you don't feel comfortable being in any 'mould'?

डॉ.सुनील अहिरराव said...

कल्पना आणि आशय खूप सुंदर. मानवी जीवनाच्या कणाकणाला क्षणोक्षणी वास्तवाची जाणिव करून देणारी कविता!

Harshada Vinaya said...

@Vaibhav, yeah the reality is same what you and I are saying but the rationality behind them is different. Choice and Not-a- choice makes a huge difference in perspective.