June 6, 2012

मग्न

वाहत्या झ-यातून आरपार,
पाहत राहते एक दगड, मग्नपणे..
पाणी वाहतंय, नितळ-लाल, काळं, निळं..
डोळे आणि दगड, दगड आणि डोळे-
यांना जोडणा-या सरळ रंगहीन रेषेला विच्छेदतात अनेक रंग पाण्याचे.
मी आपली, मग्न जोगिणी सारखी पाहत राहते रंग पाण्याचे.
लाल रंग- ते काळा रंग या आवर्तनात,
घेते अठराशे सत्तावीस श्वास, आणि 'मग्नते' दगडात.
मग्नपणे!

हर्षदा विनया

3 comments:

केदार said...

हर्षदा,
दगड आणि डोळे यांच्यामधील अदृष्य रेषेला पाण्याचे रंग विच्छेदतात, ही कल्पनाच तुमच्या आत्ममग्नतेची कल्पना देते. ..रंग पाण्याचे या सहाव्या ओळीतील शब्दांवरच कविता संपवली तरी हरकत नाही.
आपण ललित लेखन चांगले करू शकाल. यापूर्वी केले असल्यास मला कल्पना नाही. आपले गद्य विभागातील लेखन नीट उघडत नसल्याने ते वाचता आले नाही.
रवींद्र पिंगे यांचे लेखन वाचले नसल्यास अवश्य वाचावे. यशवंत पाठक हेही लक्षणीय नाव आहे.

Harshada Vinaya said...

Thank you kedar. I will try reading the suggested writers.

चैताली आहेर. said...

very nice poem dear...!