September 8, 2012

कोरडी!

तू तिच आहेस का?

अनोळखी वाटाविस इतकी कोरडी दिसते आहेस..
इतकं पाणी अंगा-खांद्या वरून वाहताना देखील कोरडी!

वाटत नाही ’तू’ आहेस ते.. ह्म्म
तुझ्या कविता किंचाळत असताना,
तू मात्र आहेस- स्तब्ध- शुन्यात!

कुणीतरी म्हणालं परवा, हळूच कानात माझ्या,
तुझ्या कविता नशा करतात म्हणे..
फ़ुंकतात सिगरेटी- आत गांजा भरुन,
पेग वर मारतात पेग.. नशेखोर दारुचे..
वर माजलेल्या संमंधासारख्या करतात नाच-- रातभर!
पण तु बरीच सोज्वळ दिसतेस गं?
तू ’तू’ वाटू नयेस इतकी!
धडकतेस शब्दांनी हत्तीसारखी,
का दचकतेस मग पाठीवर पडलं
एखादं गळून पडलेलं पान कि ?

कसं बाई जमतं तुला?
आरशासमोर कमरेवरची साडी बाजूला करून,
कविता शोधत असतात तुझ्या एक काळा तीळ!
आणि तू तर पांघरून घेतलीस कि,
रामलीलेतली द्रौपदीची न संपणारी साडी..
लोट पोट झालीस त्या साडीत
आणि बसलीस ना लपून?
कवितांपासून....

----- पुरे झाली आंघोळ..
पाणी वाया जातंय फक्त! ---

हर्षदा विनया

Update: The term 'Raamleela' was referred as 'Nautanki'- and unconsciously a blunder was made! :-P Thank you Kimantu for pointing it out!

6 comments:

Sanahadbegum Shaikh said...

khup chan lihilays Harshada...

durit timir said...

कोरडेपणा कधी कधी चालतो...कविता लपल्या का ? मला तर कोणाची तगमग आणि अशांतता जाणवली.
चांगलं आहे,

आशा जोगळेकर said...

अतरविरोध म्हणायचा.

छानच .

आशा जोगळेकर said...

नव्या कवितेची वेळ झाली .

Harshada Vinaya said...

:)

swarupa said...

sahi