November 18, 2013

उन्हं

उठून उभं राहावं
आणि दबकत जावं, खिडकीपाशी. 
झिरमिरीत पडदे बाजूला सारून,
चेहरा पुढे करावा. 
मागावे एखाद-दोन सूर्यकिरण, झेलावं थोडं उन. 
बरं वाटतं. 

आपल्या आदिम पूर्वजाला,
या उन्हाने इतकंच बरं वाटलं असेल, तंतोतंत!

व्यवहार, शहाणपण, जबाबदारी, निर्णयक्षमता
कामं, ऑफिस व तत्सम रुक्ष शब्दांना विसरून,
उन्हाचं सुख घ्यावं.

खिडकीपाशी रेंगाळणा-या कुत्र्यालाही , मांजरीलाही,
रोजचे निर्णय रोज घेणा-या मुंग्यांनाही,
या उन्हाने इतकंच बरं वाटत असेल.

आपल्यालाही ह्या उन्हावर जगता यायला हवं,
अगदी तंतोतंत.

हर्षदा विनया

5 comments:

chintatur jantu said...

mast lihilaya.

Shailendra Shirke said...

सुंदर.. काहीतरी वेगळी रचना बर्याच दिवसांनी वाचली..

आणि मनुची पत्रे ही वेगळाच प्रयोग.. थोडक्यात अस्वस्थ करणारं पत्र

Remi de Souza said...

उन हवेच! "डी" विटामिन हवे असले तर. मोफत! गोळ्या खायची गरज नाही. वानसांत फोटो सिन्थसिस पण होते.

Harshada Vinaya said...

चिंतातूर जनता - :) धन्यवाद. बाय द वे, कसली चिंता आहे इतकी?
शैलेंद्र जी- मी अशी अजून बरीच पत्रं लिहिली आहेत. म्हणजे - मनूनेच ;) - सवडीने पोस्ट करेन.
रेमी- वानसांत??? म्हणजे काय रे?

आशा जोगळेकर said...

हे हवे हवे से ऊन कधी कधी कित्ती नकोसे होते। आजकाल।