March 22, 2016

.

column मागे column, आणि row खाली row,
 भरत राहायची की excel sheet
नऊ ते पाच
जगण्याला अजून तरी काय लागतंय? 
उगाच मोह करायचे नाहीत
स्वातंत्र्याचे फालतू!


customary असलेलं सगळं जगायचं -
बाकी अधून मधून मात्र, 
असं एकंदरीत उदात्त जगायचं
आकाश कवेत  नाही घेता आलं, 

शिक्षण, नोक-या, लग्न, मुलं-बाळं 
आणि त्यांच्या ठराविक liabilities पण
:घर- गाडी, घर२- गाडी२....घरn-गाडीn
रोज खायचं तीन वेळा- शिजवायचं दोन वेळा- भाज्या आणायच्या आठवड्यातून एकदा.

येऊ द्यायचे humanism चे झटके, 
फार्म मधली हाउसेस घेऊन थोरो व्हायचे. तंतोतंत.
निघताना फिनोप्थेलीनच्या गोळ्या सांडून ठेवायच्या न विसरता, pest control साठी. 
आर्ट गॅल-या, म्युझिक, लिटरेचर तत्सम जागांमध्ये, 
भागवून घ्यायची शाब्दिक खाज.
शब्द खायचे-घोळायचे तोंडात-ओकायचे
शब्द पोटात गेले चुकून 
की सुटतात
विवेकी विचारांचे अपचनी-दुर्गंधी ढेकर 


तर गच्च्यांवर मालकी हक्क सांगून, 
वाटून घ्यायचे आभाळाचे तुकडे. 
आणि पश्चिमेकडच्या कारखान्यांकडे बोट उगारून दाखवून द्यायचा capitalism 
जगण्याला अजून काय लागतंय?