June 2, 2009

कौलारू

कौलारू घर म्हटलं, की सगळाच अंधार...
घराचं छप्पर आणि...
कितीतरी कौलांमध्ये एखादी काच..
काचेतून येणारा एक कवडसा ...
...........प्रकाशाचा...........
त्यातले असंख्य धूलीकण..
उगाच तरंगणारे....

देहाचं घर पण माझ्या..
असंच कौलारू..
बुद्धीच्या छप्पराचे...
बुद्धीच्या छप्परातही अशीच एक काच..
मनाची..
त्यातून येणारा एक कवडसा...

तरंगणारे असंख्य कण...
काही आठवांचे,
काही आसवांचे,
काही मित्रांचे..
काही मित्रांच्या अबोल्याचे...
काही विचारांचे,
काही स्वप्नांचे..
स्वप्नांसाठी झिजलेल्या अंगाचे...

काही उगाच आपले असेच.. नुसते सुन्नतेचे..
..रिकामे रिकामे.....

हर्षदा विनया

2 comments:

Dipali said...

Khup chaan lihile aahe...Manache kaularu ghar.....Konkantali asalayane kaularu ghar mala javalche aahe..

Nice one...

Remigius de Souza said...

शरीर पण घरच असतं. खरंच! घर काय अन् शरीर काय -- अन्धारं असलं तरी सारें कांहीं दिसतं. मन फार डोळस होतं. मस्त!! असंच लिहीत जा.