July 27, 2011

शब्द

पारव्याच्या बोलांमध्ये शब्द आहे एक तो,
सूर नाही, ताल नाही, गुढ आहे एक तो..

स्थिरतेला वास आहे वादळी आसवांचा,
कंदर्पाच्या बाणाचा एकमेव घात तो..

जन्म आहे,जन्म साहे,जगणे अर्थान्वित ते,
सांजवेळी पाखराचे मरणे असंगीत ते..

फुलवेडा जीव आहे, गंध आहे, संग तो,
शब्द आहे, ताल नाही, अर्थहीन हीन तो..

साथ आहे, साथ नाही, दृष्टीहीन वाट तो,
पावसाळी मेघांची एक विरक्त जात तो..

..पारव्याच्या बोलांमध्ये शब्द आहे एक तो,
सूर नाही, ताल नाही, गुढ आहे एक तो..

हर्षदा विनया

July 6, 2011

...

माझ्या पाखराचा जीव,
ओल्या मातीचं शिवार!
कसा सावरू मिठीत,
कोवळ्या आसवांचा भार?

हर्षदा