June 16, 2014

लक्षावधी फोटो काढणारी माझी बुबुळ्ळ,
जगाचं आकलन करून घेण्याचा करत असतात असफल प्रयत्न..
कारण कळत नसतं मला काहीच
स्पर्श नाही
गंध नाही
आवाज नाही
संवाद नाही...
..
नुकत्याच झोपेतून उठलेल्या डोळ्यांना काय,
किंवा कशाचाही अर्थ लागत नसलेल्या मेंदूला काय,
दिसत असते एकच स्वप्न.
..
मी रुतवुन घेत असते माझा चेहरा तुझ्या छातीत..
इतका लावते जोर.. की निव्वळ अंधार दिसावा-
शुदध अंधार..
मग शांत होते मी. स्थिर होते.
..
पुन्हा झगड़त राहते..स्वताच्या आकलनशक्तिशी,
परग्रहावरुन आल्यासारखी..
झगड़ता झागड़ता पाहते स्वप्न.. अर्थपूर्ण आणि सच्च्या अंधाराचं

हर्षदा विनया