August 2, 2010

तूला...

परिघावरचं जग,
त्याची अविरत यात्रा,
मीही आहेच प्रवासी,
तरी शोधते भेदरून..
तूला.. तूला...

चालणारे चालतायंत,
पळणारे पळतायंत,
मी मात्र रांगत राहीलेय,
माझी बाळमूठ मागते..
तूला.. तूला...

कश्या पापण्या मिटतात?
कसे उमलतात डोळे?
कसा येतो आणि हरवतो चंद्र..
एक स्वप्न पाहतं..
तूला.. तूला...

हर्षदा